वा.म.जोशी यांची नीतिमीमांसा
वा.म.जोशी ह्यांचा नीतिशास्त्रप्रवेश हा ग्रन्थ १९१९ साली प्रसिद्ध झाला. ह्यात नीतिशास्त्राच्या त्यावेळी चर्चिल्या जाणार्या सर्व प्रश्नांचे सांगोपांग विवेचन आले आहे. हे विवेचन करताना भारतीय आणि पाश्चात्य प्रमुख नीतिमीमांसकांची मते तर त्यांनी विचारात घेतलीच, पण त्यांची तौलनिक चिकित्साही स्वतंत्र बुद्धीने केली. हे पुस्तक प्रसिद्ध झाल्याला आज सत्तर वर्षे होऊन गेली आहेत. परंतु अगदी अलीकडे प्रसिद्ध झालेली …